Organized Maharojgar Mela at Jejuri under ‘Sasan Apya Dari’ Abhiyan
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत’ जेजुरी येथे महारोजगार मेळाव्याचे आयोजन
महारोजगार मेळावा २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे
पुणे : ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्यामार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे २३ जुलै रोजी सकाळी १० वाजता जेजुरी पालखी तळ (ता. पुरंदर) येथे आयोजन करण्यात आले आहे.
या महारोजगार मेळावाद्वारे विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांना नोकरीची विविध संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बेरोजगार उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने, त्यांच्यासह इतर सर्वच इच्छुक उमेदवारांनी रिक्तपदांच्या अधिक माहितीसाठी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने नोंदवावेत.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी सोबत आपली सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, आवश्यकतेनुसार संक्षिप्त परिचयासह अर्ज व आधारकार्डच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात. खाजगी क्षेत्रातील या विविध रिक्तपदांच्या प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जास्तीत जास्त नोकरीइच्छूक उमेदवारांनी २३ जुलै रोजी सकाळी १० वा. महारोजगार मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहाय्यक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी केले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com